भडगाव महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे उदघाटन संपन्न


(भडगाव प्रतिनिधी प्रा सुरेश कोळी )
भडगाव येथील पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचालित सौं.आर. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील वाणिज्य विभागाच्या वतीने आज वाणिज्य मंडळाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते या वेळी मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ.योगेश पुरी यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री योगेश पुरी यांनी नवीन शैक्षिक धोरण, विद्यार्थीना शिक्षण घेत असतांना नवीन माहिती सोबतच त्यांनी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच आवश्यक असलेले गुण आणि विविध कौशल्य आत्म सात करण्यासाठी मार्गदर्शन केले  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ एन एन गायकवाड हे उपस्थित होते. अध्यक्षिय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यावहारिक विविध दाखल्याच्या माध्यमातून वाणिज्यशाखेतील विविध संकल्पना समजून सांगितल्या आणि वाणिज्य शाखेमध्ये यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालया तील वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा डॉ सचिन हडोळतीकर यांनी प्रास्ताविक केले तसेच कार्य क्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन चौधरी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा उदय कासार यांनी मांडले यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय वाणिज्य वर्गातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद