नुकतेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा शाखेचे 5 वे अधिवेशन पाचो-यात संपन्न झाले त्यात सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले!
अनिल आबा येवले "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित
"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषू कदाचन.... या गीतेतील पंक्ती नुसार माणूस केवळ कर्मानेच मोठा होतो. निष्काम कर्म हाच खरा मानवी जीवनाचा अर्थ व मोक्ष असल्याचे यातून स्पष्ट होते. केवळ सत्कर्म करीत राहणे हे व्रत घेऊन त्या आधारे कार्य व वाटचाल करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते आबा येवले यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्या अथक कार्य व सत्कर्मावर जणू काही शिक्कामोर्तबच झाले आहे. मुस्लिम वस्तीला लागून असलेल्या सोनार गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून अनिल येवले व त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे ज्वलंत उदाहरण द्यायचे असेल तर ते अनिल आबांचे कुटुंब आहे. मुस्लिम वस्ती जवळ राहून देखील कधीही कुणाशी मतभेद , वैर , भांडण तंटा किंवा जातीभेद केल्याचे एकही उदाहरण मिळणार नाही अशी वागणूक आमचे गुरुवर्य आबासाहेब अनिल येवले यांची आहे.
कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो त्याच्या कार्याचा साधक बाधक आढावा घेऊन त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने माहिती संकलित करून फोटोसह प्रसारित करण्याचा त्यांचा आवडता छंद अनिल आबा जोपासत आहेत. कोणताही शासकीय अधिकारी असो त्यांच्याशी स्नेह व आपुलकीने वागणारे अनिल आबा सर्वांनाच हवेहवेसे वाटतात . कोणत्याही समाजाच्या महिला मंडळाचे कार्यक्रम असो तेथे अनिल आबांची उपस्थिती व फोटो काढण्याची लगबग साऱ्यांनाच आकर्षित करते. गावातील कोणतीही समस्या असो ती कळताच त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी अनिल आबा जंगजंग पछाडतात. काही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी गांधीगिरी केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
साधी राहणी उच्च विचारसरणी यासोबतच समाजातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती माणूस असो त्याच्याशी माणसासारखे वागणे , अन्यायग्रस्तांना न्याय , खचलेल्यांना धीर व दिलासा देणारे अनिल आबा पत्रकारितेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहेत.
विनोदी , स्पष्टवक्ता , निडर , प्रामाणिक , संगिताच्या तालावर स्वच्छंद नृत्य असे महत्वाचे पैलू अनिल आबांच्या व्यक्तिमत्त्वात सर्वार्थाने दिसून येतात.अनेकांच्या व्यक्तिगत व कौटुंबिक विषयातही मोठ्या हिंमतीने सहभागी होऊन सामंजश्याची भूमिका घेऊन अनेकांचे कौटुंबिक कलह मिटविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा व सहभाग राहिला आहे.
त्यांच्या या अष्टपैलू कार्याची व व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत "जीवन गौरव" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. काही व्यक्ती पुरस्काराने मोठ्या होतात तर काही पुरस्कार लायक व्यक्तीमुळे मोठे होतात. याचीच अनुभूती अनिल आबा येवले यांना मिळालेल्या पुरस्कारातून आली आहे.अनिल आबांचे 💐अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐 व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सह त्यांच्या सेवाभावी कार्यास कोटी कोटी नमन व पुनश्च 💐शुभेच्छा💐
Comments
Post a Comment